अमळनेरमध्ये एसआयआर मतदार नोंदणी महामेळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर : एसआयआर मतदार नोंदणी महामेळ्याला अमळनेर शहरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अमळनेर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी संत सखाराम महाराज नगर तसेच साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमाची पाहणी केली. त्यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.

युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. अशोक पवार आणि मुन्ना पवार यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन जनजागृती पत्रकांचे वितरण केले. तसेच नागरिकांना मतदार नोंदणी व आवश्यक फॉर्म एकाच ठिकाणी भरता यावेत, यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या उपक्रमामुळे नागरिकांची गैरसोय टळली असून मोठ्या संख्येने मतदारांनी नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

India@2022

  • Related Posts

    अमळनेर, न्यू प्लॉटमधील घर जमीन द सरजकलानी,महेश देशमुख व गाव गुंडा ना अटक करा व सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा. प्रा अशोक पवार उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना त्वरित अटक करा.अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी 24 तास उशिरा फिर्याद नोंदविली व फिर्यादीस समेंट करण्यासाठी दडपण आणले अशा पक्षपाती व बिल्डरांची बाजू घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाचा तपास काढून घ्या व सीआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट )उपाध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

    India@2022

    अमळनेर येथे चार तालुक्यांचे होमगार्ड तिमाही संमेलन संपन्न

    अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा व चोपडा तालुक्यातील होमगार्डचे तिमाही संमेलन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात होमगार्डच्या विविध समस्या, अडचणी व मागण्यांवर सविस्तर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!