स्वामी नारायण गुरुकुलात प्रा. रविंद्र माळी यांचे पुस्तक प्रकाशीत अमळनेर:

 

 

 

 

अमळनेर: श्री स्वामी नारायण संप्रदायातील एक भव्य समारंभ शाकोत्सव 2026 मध्ये प्रा. रविंद्र माळी यांचे Pharmacy, Law and Ethics या विषयावरील पुस्तकाचे सर्व संत गण व स्थानिक मंत्री श्री. गजेंद्रसिंग जी. परमार यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले
अमळनेर नगरीचे सुपुत्र प्रा. माळी हे श्री स्वामीनारायण विश्व मंगल गुरुकुल व स्वामी नारायण युनिव्हर्सिटी, कलोल, जि. गांधीनगर, गुजरात, संचलित फार्मसी महाविद्यालयात सेवारत आहेत. त्यांच्या या गौरवपुर्ण कार्यासाठी गुरुकुलचे व युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष स्वामी प्रेमस्वरूपदासजी, संत भक्तवत्सलजी, भक्तीनंदनजी, व सर्व गुरुकुल मधील संत, युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. रूपेश वसाणी, रजिस्ट्रार डाॅ. अजित गंगावने, विविध शाखेचे डिन, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
क्षत्रिय कांच माळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, सर्व पंच मंडळ सदस्य, समाज बांधव, मित्र परिवार, अमळनेर येथील फार्मसी महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू यांनी ही प्रा. रविंद्र माळी यांचे अभिनंदन केले .
प्रा. रविंद्र माळी हे अमळनेर येथील बी बियाणे व किटकनाशक औषध विक्रेते श्री. गंगाराम दोधू महाजन यांचे सुपुत्र आहेत.

India@2022

  • Related Posts

    क्रांतीज्योती पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने एकाच दिवशी शंभर महिलांच्या व्याख्यानाने अभिवादनः

    क्रांतीज्योती सावित्रीबाई लढल्या म्हणून महिला घडल्या. एकाच दिवशी शंभर महिलांच्या व्याख्यानाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन. युवा कल्याण प्रतिष्ठान, अंमळनेर चा अभिनव उपक्रम. अमळनेर प्रतिनिधी –  क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले यांच्या जयंतीनिमित्त युवा…

    भरवस, माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा.

    अमळनेर तालुक्यातील भरवस येथे कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन दादासो डॉ. श्री.संजय सोनवणे व कार्यक्रमाचे प्रमुख…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!