धुळे शहरामध्ये रंगणार मराठी साहित्य संमेलन सोहळा.

तालुका ( प्रतिनिधी) –
कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर धुळे आणि मराठी साहित्य मंडळ, ठाणे या प्रख्यात संस्थेच्या वतीने संयुक्त रित्या देवपूर धुळे शहरातील महिला महाविद्यालयात रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन मा. दादासाहेब अनिल भाईदास पाटील ( मा.मदत व पुनर्वसन मंत्री, आमदार अमळनेर विधानसभा) यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष स्थान नगाव येथील जेष्ठ लेखक – समाज सेवक आदरणीय नानासाहेब मा. शशिकांत तुकाराम भदाणे हे भूषविणार असुन सातारा कोरेगाव येथील ज्येष्ठ लेखक अँड.पुरुषोत्तम कृष्णाजी बारसावडे हे मावडते संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने संमेलनाचे अध्यक्ष भदाणे यांना पुढील सुत्रे सोपविणार आहेत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या सर्वेसर्वा मा.स्मिता अतुल अजमेरा या उपस्थित राहणार आहेत. धुळे लोकसभा खासदार मा.डॉ. शोभाताई बच्छाव तसेच धुळे जिल्हाधिकारीकारी मा-जितेंद्र पापळकर ,मा.मेघा विलास कमेरकर ,( उपाध्यक्ष वेस्ट खान्देश भगिनी मंडळ,धुळे) नासिक येथील जेष्ठ कवियत्री लतिका गवांदे तसेच कराड ज्येष्ठ कवी तथा माजी संमेलनाध्यक्ष मा. सुरेश लोहार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार .
तसेच धुळे शहराचे आमदार मा. अनुप अग्रवाल साहेब, ‌महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.झेड. चौधरी साहेब, नाशिक येथील डि.एस.पी, सर्वधर्म प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.जी.के.गोपाळ साहेब ,अँड अम्रिता अतुल अजमेरा (सचिव,वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ, धुळे) तसेच पुणे येधील माजी संमेलनाध्यक्ष मा.डॉ. विनायकराव जाधव आदि मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष मा. शिध्दार्थ कुलकर्णी, जळगांव जिल्हाध्यक्ष मा. बापूसाहेब आनंदराव पाटील ( ठाकरे ), तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष.मा. योगेश रोकडे मराठी साहित्य मंडळ मान्यवर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद होणार असून सोलापूर येथील जेष्ठ लेखिका मा.डॉ.रजनी दळवी या परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत .नागपूर येथील मा. डॉ.प्रवीण अंपलेचवार तसेच धुळे येथील डॉ. पापालाल पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर होणाऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्ष अलिबाग रायगड जिल्हाध्यक्ष जेष्ठ कवी मा. राजेश थळकर हे कवी संमेलनाचे अध्यक्षपद बसवणार असून धुळे येथील ज्येष्ठ कवियत्री मा. मंगला राजपूत तसेच कोल्हापुरातील जेष्ठ कवियत्री मा. सुनंदा बागडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कवी संमेलनामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी धुळे येथील डॉ. ममता काशिनाथ भराडे – सोनावणे आणि मा. प्रवीण शंकरा थोराते परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत याच संमेलनामध्ये जीवन गौरव पुरस्कार साठी राज्यातून एका व्यक्तीची निवड केली जाते हा सर्वात मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सावित्रीबाई जीवन गौरव पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरडव गावातील ज्येष्ठ साहित्यिक माननीय देविदास रामभाऊ बांगर यांना उपस्थित मान्यवरांच्या असे प्रदान करण्यात येणार आहे . तसेच राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कारासाठी मालेगाव रोड धुळे येथील सौ. आशा प्रकाश पाटील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बामखेडा गावातील श्री.सुहास रमेशचंद्र चौधरी यांना समाज भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तसेच राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कारासाठी खालील लेखकांची निवड झाली आहे. धायरी पुणे येथील मोगल सीताराम जाधव यांच्या फलश्रुती या आत्मचरित्राला तसेच शिरपूर येथील बाळू विठोबा श्रीराम यांच्या ‘आहे करार बहुदा’ या गजल संग्रहाला तर देवपूर धुळे येथील संजय धनगव्हाण यांच्या ‘सुखलेल्या मातीच गर्हाण’ या कवितेसंग्रहाला आणि चाळीसगाव रोड धुळे येथील राजेश गोरक्षनाथ यांच्या ‘चांदोबाचा दिवा’या बालकविता संग्रहाला तसेच धुळे येथील अँड. सुरेश रघुनाथ सोनवणे यांच्या ‘स्मृतिगंध’ या पुस्तकाला तसेच श्रीमती सुनंदा शोभा निकम ,जमनागिरी रोड धुळे येथील कैसेन( योद्धा) आत्मचरित्रपर चरित्राला राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरणास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र ,ग्रंथ भेट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे असे धुळे जिल्हाध्यक्ष .श्रीमती सुनंदा शोभा निकम यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे .ममता सोनवणे आणि प्रवीण थोरात हे आयोजन समितीचे सदस्य आहेत. या संमेलनाचे श्री.राजेश सोनार मुख्य संयोजक असून, संजय धनगव्हाळ, दत्तात्रय कल्याणकर ,राम जाधव, मुरलीधर पांडे, सुनील बोरसे, आणि प्रवीण सर हे संयोजन समितीचे सदस्य आहेत या संपूर्ण साहित्य संमेलनाचे संचालन महिला महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख सुप्रसिद्ध निवेदक श्री विनोद वासुदेव अपर्वटहे करणार आहेत . राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळून निघणाऱ्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन ,धुळे महानगरपालिका आयुक्त मा. अमिता दगडे पाटील या करणारा असून संमेलनाअध्यक्ष श्री.शशिकांत भदाणे ,प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी,प्रा संजय सोनावणे प्रा.डॉक्टर दगडू वाघ ,डॉ. राजेश मगनलाल शहा आदी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी ग्रंथ दिंडी, संमेलनास्थळी पोहोचल्या नंतर सर्व मान्यवरांनी तसेच पुरस्कार प्राप्त सभासदांनी ,निमंत्रित कवींनी, नवोदित कवींनी, परिवारासह संमेलन स्थळी दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहावे अशी विनंती आयोजन समितीच्या सदस्यांनी पत्रकात केली आहे.

India@2022

  • Related Posts

    अमळनेर नगरीत पहिल्यांदाच खान्देश साहित्य संघाच्या वतीने १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एल आय सी कॉलनी खुला भूखंड , लक्झरी बस स्टॉप समोर धुळे रोड अमळनेर येथे भव्य ‘आखाजी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

    या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला खान्देशी लोककला, गाणी आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे म्हणून अध्यक्ष प्रा.…

    अमळनेर नगरीत पहिल्यांदाच खान्देश साहित्य संघाच्या वतीने १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एल आय सी कॉलनी खुला भूखंड , लक्झरी बस स्टॉप समोर धुळे रोड अमळनेर येथे भव्य ‘आखाजी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला खान्देशी लोककला, गाणी आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे म्हणून अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी (केंद्रीय अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र) तर उद्घाटक म्हणून मा. राजेशजी पांडे ( प्रदेश सरचिटणीस, भाजपा) उपस्थित राहणार आहेत. आखाजी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ,श्री. अशोक आधार पाटील (सभापती, कृ.उ.बा.स. अमळनेर) असतील तर ग्रामीण संस्कृती , आखाजी महोत्सव या विषयावर प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. योगिता पाटील (अहिराणी लेखिका, धुळे) प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. हा आखाजी महोत्सव म्हणजे महिलांसाठी तर आनंदाची पर्वणी असेल. यावेळी खापर वरील पूर्ण पोळ्या बनवण्याची स्पर्धा , झोक्यावरील अहिराणी गीतांची स्पर्धा , गौराई च्या अहिराणी गाण्याची स्पर्धा , घट्यावरील गाण्याची स्पर्धा , वेशभूषा आणि एक मिनिटात उखाणे आदी स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक विजेत्याला अनुक्रमे गौराई आणि प्रथम ५ हजार ,द्वितीय ३ हजार , तृतीय २ हजार आणि प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अहिराणी शब्द व संस्कृती वाङ्मयावर चालता बोलता प्रश्न मंजुषा कार्यक्रम देखील होणार असून बक्षिसे दिले जातील. यासह ग्रामीण भागातील बचत गट अस्सल गावराणी खाद्य पदार्थ आणि वस्तूंचे विविध स्टॉल देखील लावणार आहेत. या आनंदी महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. स्मिताताई उदय वाघ, (जळगांव लोकसभा), मा. आ. अनिल भाईदास पाटील, (माजी मंत्री, अमळनेर विधानसभा ) ,मा. कृषिभूषण साहेबराव पाटील, (माजी आमदार, अमळनेर ), मा. डॉ. बी. एस. पाटील, (माजी आमदार, अमळनेर विधानसभा ),मा. शिरीष हिरालाल चौधरी,( माजी आमदार, अमळनेर विधानसभा ) ,मा. डॉ. परीक्षित बाविस्कर, (लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर ),मा. प्रशांत मनोहर निकम,( उपनगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद) ,मा. अॅड. व्ही. आर. पाटील, (माजी जि. प. सदस्य, जळगाव ),मा. विक्रांत भास्करराव पाटील,( माजी नगरसेवक, अमळनेर) डॉ. अविनाश रघुराज जोशी,(अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर ),डॉ. डिगंबर विठ्ठल महाले, (अध्यक्ष, मंगळग्रह मंदिर संस्थान, अमळनेर) मा. सचिन बाळू पाटील,(संचालक, कृ.उ.बा.स., अमळनेर ) ,(मा. अमेय प्रकाश मुंदडा, मुंदडा बिल्डर्स, अमळनेर) ,मा. सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर, (प्रदेशाध्यक्ष, रा.काँ. ग्रंथालय विभाग ),मा. प्रविण गंगाराम पाटील ( राजू फापोरेकर), नगरसेवक, अमळनेर , मा. सचिन बळवंत पाटील,( नगरसेवक, अमळनेर), ज्ञानेश्वर धनगर (माजी तज्ज्ञ संचालक बाजार समिती, अमळनेर), जयेशकुमार काटे (संस्थापक अध्यक्ष शिवशाही फाउंडेशन, अमळनेर ) मा. प्राचार्य रत्नाताई पाटील, (खजिनदार, खान्देश साहित्य संघ, महा.),मा. रमेश आप्पा बोरसे, (सचिव, खान्देश साहित्य संघ, महा.) उपस्थित राहणार आहेत खान्देश साहित्य संघाला नेहमीच मार्गदर्शक साहित्यिक मा. श्री. कृष्णा आनंदा पाटील, (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त),मा. श्री. सुभाष मोतीराम पाटील, (जेष्ठ साहित्यिक, मा. श्री. हिरामण अभिमन कंखरे, (जेष्ठ कवी), मा. श्री. गोकुळ गोविंदा बागुल, (अहिराणी साहित्यिक ),मा. श्री. शाहीर नाना पाटील, (अहिराणी साहित्यिक) मा. श्री. भाऊसाहेब देशमुख, (साहित्यिक) यांचे मार्गदर्शन असते. या पत्रकार परिषदेस खान्देश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी, पू सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील ,कार्याध्यक्ष डॉ कुणाल पवार , साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष शरद धनगर ,कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे, उपाध्यक्ष डी ए धनगर , सचिव उमेश काटे यांच्यासह साहित्य संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तरी सर्व पत्रकार बंधूनी या आखाजी महोत्सवात आवर्जून उपस्थित राहून खान्देशी संस्कृतीचा आनन्द लुटावा आणि वृत्त प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती. खान्देश साहित्य संघ जळगाव जिल्हा

    या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला खान्देशी लोककला, गाणी आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे म्हणून अध्यक्ष प्रा.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!