भरवस, माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा.

अमळनेर तालुक्यातील भरवस येथे कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन दादासो डॉ. श्री.संजय सोनवणे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव व माजी मुख्याध्यापक बापूसो व्ही .एस .सोनवणे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून श्री.अतुल पाटील सर उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी अंजली सुनील पाटील, लावण्या गणेश पाटील, कार्तिकी अरुण पाटील व प्रियंका भरत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव बापूसो व्ही .एस .सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात संस्थेचे ,गावाचे व पालकांचे नावलौकिक वाढवण्यासंबंधी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. मेहनत व जिद्द यामुळे यश हमखास मिळते यासाठी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील राहावे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष दादासो प्रा. श्री संजय सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून परीक्षेला सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढवले .जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व जिद्द आत्मसात करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.शाळेचे मुख्याध्यापक व इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री डी .बी .पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचे दिवंगत अध्यक्ष कै. अण्णासाहेब श्रीराम गबाजीराव सोनवणे यांच्या कठोर परिश्रमाविषयी व गावातील शाळेचे लौकिक वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती .एम.टी. चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन श्री एस.डी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

India@2022

  • Related Posts

    स्वामी नारायण गुरुकुलात प्रा. रविंद्र माळी यांचे पुस्तक प्रकाशीत अमळनेर:

            अमळनेर: श्री स्वामी नारायण संप्रदायातील एक भव्य समारंभ शाकोत्सव 2026 मध्ये प्रा. रविंद्र माळी यांचे Pharmacy, Law and Ethics या विषयावरील पुस्तकाचे सर्व संत गण व…

    क्रांतीज्योती पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने एकाच दिवशी शंभर महिलांच्या व्याख्यानाने अभिवादनः

    क्रांतीज्योती सावित्रीबाई लढल्या म्हणून महिला घडल्या. एकाच दिवशी शंभर महिलांच्या व्याख्यानाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन. युवा कल्याण प्रतिष्ठान, अंमळनेर चा अभिनव उपक्रम. अमळनेर प्रतिनिधी –  क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले यांच्या जयंतीनिमित्त युवा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!