भरवस विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न”

दिनांक 23 ऑगस्ट रोजी कैलासवासी श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 1999-2000 च्या विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे माजी मुख्याध्यापक व सचिव श्री.विजय श्रीराम सोनवणे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय श्रीराम सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातून, मिळवलेल्या यशाबद्दल शाळेला व गुरुजनांना धन्यवाद देऊन माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करून उपक्रृत केले. जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी वर्गात बसून इंग्रजी व गणित विषयाच्या तासिकांचा आनंद घेत छड्यांचा अनुभव घेतला. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय सोनवणे यांनी माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल बोलतांना सहर्ष स्वागत करत संस्थेचे माजी अध्यक्ष कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छां दिल्या.अध्यक्षिय भाषणात श्री.विजय सोनवणे यांनी माजी विद्यार्थ्यांना त्यांच्यावर शाळेत झालेल्या संस्कार व स्वतःची मेहनत यांच्यासह यशाबद्दल कौतुक कले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थ्यांकडून मनोगत व्यक्त करतांना दिनेश पाटील, भटू सुर्यवंशी, रविंद्र पाटील व माधुरी पाटील यांच्यासह अनेकांनी आपल्या भाषणात शाळेतील अनुभव कथन करून शिक्षकाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी पंकज बन्सीधर पाटील यांनी केले. समारोप उपशिक्षिका श्रीमती मंगला चव्हाण यांनी केला.

India@2022

  • Related Posts

    तिमिरातुनी तेजाकडे’ वास्तवतेचा मार्ग दाखविणारी पुस्तिका! -संदीप घोरपडे

    स्वातंत्र्य दिनास प्रकाशन सोहळासंपन्न अमळनेर – उमलत्या वयात स्वतःच्या शरीराबद्दल अनेक प्रश्न पडतात, त्याचे शास्त्रीय उत्तर मिळाले नाही तर मुले मुले मानसिक आरोग्य खराब करून घेतात हे टाळावे म्हणून सोप्या…

    भरवस येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्साहपूर्ण साजरा

    भरवस – आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी लवकरच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!