….. ………… दिल्ली येथे मंगळ ग्र्रह सेवा संस्थेचा वाजला डंका..! आनंद महाले यांना समारंभपूर्वक केले सन्मानित …………..

 

अमळनेर ः येथील मंगळ ग्रह सेवा संस्था म्हणजे सामाजिक जाणिवेचे उचित भान असलेली संस्था आहे, हे दीर्घकाळापासून विविध प्रकारे सिद्ध झाले आहे. दिल्ली येथे देशातील अग्रगण्य समाजसेवी संस्थांच्या (एनजीओ) कार्यक्रमात संस्थेचे एकूणच कार्य पाहून संस्थेला मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या वतीने विश्वस्त तथा दै. ग्लोबल महातेजचे संपादक आनंद महाले यांनी संस्था व श्री मंगळग्रह मंदिर यांनी केलेले व करीत असलेल्या सर्व कार्याची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या साह्याने इत्यंभूत माहिती दिली. उपस्थित प्रतिष्ठीत संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार टाळ्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. एनजीओच्या क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे राजेश वर्मा यांच्या शुभहस्ते आनंद महाले यांना शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित देशभरातील अनेक मान्यवरांनी मंदिराला भेट देण्याची तथा समक्ष येऊन संस्थेचे कार्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
……………..

India@2022

  • Related Posts

    अमळनेर, न्यू प्लॉटमधील घर जमीन दोस्त करणाऱ्या सरजू गोकलानी,महेश देशमुख व गाव गुंडा ना अटक करा व सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा. प्रा अशोक पवार उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )

      अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना…

    उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला सोलापूरमधील घटना, एका आरोपीला अटक, पोलिस तपास सुरू …. … … … … … .. ….

    महाराष्ट्र राज्यात आपल्या सामाजिक कार्याची छाप पाडत अनेक उद्योजकांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देणारे उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. राणा सूर्यवंशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!