दिवाळीची सुरुवात बळीराजाला घास भरवून…!

 

यावर्षी संपूर्ण अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून या शेतकरी बळीराजाला आधार देऊन त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा संकल्प करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी ” दिवाळीची सुरुवात बळीराजाला घास भरवून ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी महात्मा बळीराजा व नांगराची पूजा करत मांडळ येथील शेतकरी दांपत्य मा.दिनेश पाटील व सौ.प्रतीक्षा पाटील यांचा साडी व टोपी रुमाल देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात प्रा.लिलाधर पाटील यांनी महात्मा बळीराजा विषयी माहिती दिली व आभार श्याम पाटील यांनी व्यक्त केले

कार्यक्रमास डॉ.अनिल शिंदे , नानासाहेब सूर्यवंशी , विजय चव्हाण , दयाराम पाटील , गुणवंत पवार , वाल्मीक मराठे , श्रीकांत चिखलोदकर , सुधीर पाटील यांच्यासह असंख्य महिला , युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते…!

India@2022

Related Posts

अमळनेरमध्ये एसआयआर मतदार नोंदणी महामेळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर : एसआयआर मतदार नोंदणी महामेळ्याला अमळनेर शहरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अमळनेर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी संत सखाराम महाराज नगर तसेच साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे भेट…

अमळनेर, न्यू प्लॉटमधील घर जमीन द सरजकलानी,महेश देशमुख व गाव गुंडा ना अटक करा व सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा. प्रा अशोक पवार उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना त्वरित अटक करा.अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी 24 तास उशिरा फिर्याद नोंदविली व फिर्यादीस समेंट करण्यासाठी दडपण आणले अशा पक्षपाती व बिल्डरांची बाजू घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाचा तपास काढून घ्या व सीआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट )उपाध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

India@2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!