हिंगोणे येथील रामकुवर परिवाराचा क्रांतिकारी निर्णय !….

चौफेर नजर

अमळनेर प्रतिनिधी

  1. शिंदखेडा येथे प्रथमच सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध (साखरपुडा ) संपन्न !…

प्रतिनिधी –

धरणगांव – तालुक्यातील हिंगोणे बुद्रक या गावातील गोकुळ बळीराम पाटील यांचे चिरंजीव सत्यशोधक प्रशांत यांचा शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालय येथे महात्मा जोतीराव फुले निर्मित सत्यशोधक समाज संघाच्या सार्वजनिक सत्यधर्मीय विधीनुसार सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम वधू-वरांच्या हस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावातील हिलाल व मुरलीधर बळीराम पाटील यांचे पुतणे व गोकुळ बळीराम पाटील यांचे चिरंजीव सत्यशोधक प्रशांत व शिंदखेडा येथील दयाराम मुकुंदा माळी यांची पुतणी व शंकर मुकुंदा माळी यांची कनिष्ठ कन्या सत्यशोधिका पल्लवी दि. ४ / ११ / २०२४ सोमवार रोजी धुळे येथील सत्यशोधक विधीकर्ते राजकिशोर तायडे यांच्या हस्ते सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध ( साखरपुडा ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या साक्षगंध कार्यक्रमासाठी सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे प्रमुख अतिथी होते तसेच शिंदखेडा व धरणगांव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व आप्तेष्ट- नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साक्षगंध सोहळ्याच्या निमित्ताने सत्यशोधक विधीकर्ते राजकिशोर तायडे यांनी सत्यशोधक समाज संघाच्या संदर्भात विस्तृत माहिती सांगून मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात गावोगावी सत्यशोधक पद्धतीने विवाह, साखरपुडा, दशपिंडविधी, गृहप्रवेश व्हावेत असे आवाहन केले. येत्या ३० नोव्हेंबर, व १ डिसेंबर २०२४ ला नायगाव येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहिल्यानगर ( अहमदनगर ) पार पडणार आहे या अधिवेशनात महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. या अधिवेशनासाठी रामकुवर व जाधव परिवाराने ११०० रुपयांचा निधी संघटनेला दिला.
हिंगोणे बुद्रुक येथील रामकुवर परिवार व शिंदखेडा येथील जाधव परिवार यांनी आपल्या परिवारात पहिलाच सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध करून क्रांतीची सुरुवात केलेली आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या क्रांतीकारी सोहळ्यासाठी सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, जळगाव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांचे मार्गदर्शन लाभले.

India@2022

  • Related Posts

    अमळनेरमध्ये एसआयआर मतदार नोंदणी महामेळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

    अमळनेर : एसआयआर मतदार नोंदणी महामेळ्याला अमळनेर शहरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अमळनेर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी संत सखाराम महाराज नगर तसेच साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे भेट…

    अमळनेर, न्यू प्लॉटमधील घर जमीन द सरजकलानी,महेश देशमुख व गाव गुंडा ना अटक करा व सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा. प्रा अशोक पवार उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना त्वरित अटक करा.अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी 24 तास उशिरा फिर्याद नोंदविली व फिर्यादीस समेंट करण्यासाठी दडपण आणले अशा पक्षपाती व बिल्डरांची बाजू घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाचा तपास काढून घ्या व सीआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट )उपाध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

    India@2022

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!