मंदिर पर्यटनाचा प्रवास: एसटी बसद्वारे अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिराची प्रसिद्धी

अमळनेर(चौफेर नजर प्रतिनिधी): अमळनेर येथील सुप्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिराची ख्याती आता महाराष्ट्रभर पोहोचत आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या नेतृत्वाखाली या मंदिराच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांची माहिती महाराष्ट्रातील भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिंगबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) सहकार्याने हा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमांतर्गत एसटी बसच्या माध्यमातून मंदिराची माहिती आणि परंपरेचे महत्त्व प्रसारित केले जाणार आहे. यासाठी प्रोजेक्ट इन अँड आउट अॅडव्हर्टायझिंग प्रा. लि. सोबत करार करण्यात आला आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे भाविकांना मंदिराशी जोडण्याचा प्रयत्न होईल तसेच मंदिराच्या कार्याची आणि वैशिष्ट्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचेल. परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या या मोहिमेसाठी ग्रीन कन्सल्टंट सुभाष पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

India@2022

  • Related Posts

    श्री मंगळ जन्मोत्सव अभूतपूर्व सोहळ्यास २९ पासून सुरुवात तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रम : मंगळवारी जन्मोत्सवाचा २७ वर्षांनी योग

        अमळनेर : श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर २७ वर्षांनी येतो. हा मंगल महायोग यावर्षी २ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे मंगळग्रह सेवा…

    श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय होण्यासाठी स्वयंस्फुर्तीने सेवा द्या खा. स्मिता वाघ व आ. अनिल पाटील यांनी बैठकीत केले आवाहन

      अमळनेर : श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर २७ वर्षांनी येतो. हा मंगल महायोग येत्या २ सप्टेंबर रोजी येत असून या समारोहात भारतातील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!