अनिल पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आर्थिक मदत लवकरच खात्यावर

अमळनेर: जून व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मंजूर झाली असून 30 गावांतील शेतकऱ्यांना सुमारे पावणे सात कोटींचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पातोडा परिसरातील 18 गावे आणि शिरुड मंडळातील 14 गावे या ठिकाणी हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्काळ पंचनामा करून मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला होता. त्यावेळी अनिल पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री होते आणि त्यांनी राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले होते. अखेर शासनाने या मदतीस मंजुरी दिली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.

जून 2024 मधील बाधित गावे:
शिरुड मंडळातील खडके, जवखेडे, पिंपळे बुद्रुक, शिरुड, इंद्रा पिंपरी, डांगर बुद्रुक, रणाईचे बुद्रुक, अंचलवाडी, रणाईचे खुर्द, लोंढवे, निसरडी, वाघोदा यांसह 12 गावांतील शेतकऱ्यांना 1 कोटी 55 लाख 14 हजार 386 रुपयांची मदत मिळणार आहे.

ऑगस्ट 2024 मधील बाधित गावे:
पातोडा परिसरातील पातोडा, नांद्री, खवशी बुद्रुक, दापोरी बुद्रुक, धावडे, धुरखेडा, कामत वाडी, मुंगसे, दापारी खुर्द, रुंधाटी, मठ गव्हाण, नालखेडा, गंगापूरी, खापर खेडा प्र ज, जळोद, खेडी खुर्द प्र ज, खेडी सीम प्र ज या 18 गावांतील शेतकऱ्यांना 5 कोटी 28 लाख 63 हजार 28 रुपयांची मदत मिळणार आहे.

शासनाने मंजूर केलेली ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल.

India@2022

  • Related Posts

    पाडळसरे प्रकल्पाला प्रधानमंत्री सिंचन योजनेत मान्यता; जलसिंचनाचे नवे दालन खुले

    अमळनेर – जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे धरण प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला असून हा प्रकल्प आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अमळनेरसह जिल्ह्यातील सहा तालुक्यांना जलसिंचनाची…

    अमळनेरच्या आवाजाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ — ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ चा चाचणी प्रसारणास प्रारंभ

    अमळनेर: अमळनेरच्या इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मंगळ ग्रह सेवा संस्थान, अमळनेर’ यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मान्यतेनंतर ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 एफ.एम.’…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!