अमळनेर तालुक्यात निवडक शेतकरी गटांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर मंगळग्रह सेवा संस्था व पानी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

अमळनेर (ता. प्रतिनिधी) – महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या पानी फाऊंडेशनच्या पुढाकाराने अमळनेर तालुक्यातील निवडक शेतकरी गटांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने मंगळग्रह मंदिराच्या सभागृहात २४ व २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

 

तालुक्यात पानी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी गट कार्यरत आहेत. त्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २० ते २५ गावांतील शेतकरी गटांना या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले आहे. दररोज ६० शेतकरी सहभागी होतील, अशा प्रकारे एकूण १२० शेतकरी या शिबिरात सहभागी होणार आहेत.

 

सदर प्रशिक्षणासाठी फक्त पानी फाऊंडेशनतर्फे निवड झालेल्या शेतकऱ्यांनीच सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जलसंधारण व वॉटरशेड बांधणीसंदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या प्रशिक्षणात दिले जाणार आहे.

India@2022

  • Related Posts

    अमळनेर, न्यू प्लॉटमधील घर जमीन दोस्त करणाऱ्या सरजू गोकलानी,महेश देशमुख व गाव गुंडा ना अटक करा व सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा. प्रा अशोक पवार उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )

      अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना…

    ….. ………… दिल्ली येथे मंगळ ग्र्रह सेवा संस्थेचा वाजला डंका..! आनंद महाले यांना समारंभपूर्वक केले सन्मानित …………..

      अमळनेर ः येथील मंगळ ग्रह सेवा संस्था म्हणजे सामाजिक जाणिवेचे उचित भान असलेली संस्था आहे, हे दीर्घकाळापासून विविध प्रकारे सिद्ध झाले आहे. दिल्ली येथे देशातील अग्रगण्य समाजसेवी संस्थांच्या (एनजीओ)…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!